पोस्ट क्र . १: प्रस्तावना, मनोगत, निवेदन वगैरे. ढोल-ताशांचा कडकडाट. दोन कोल्हे येतात. दमनक आणि करटक . यांची तुमच्याशी पंचतंत्रात ओळख झाली होतीच. दमनक - पन्नाशीचा, संसारी, विनम्र, आळशी . सर्व गोष्टींबाबत अफाट कुतूहल हा याचा सर्वात मोठा सद्गुण . करटक - बुजुर्ग-दिग्दर्शक, हितचिंतक , टप्पल-मारक. सध्या तो ब्लॉगकर्त्यास चॅनेल करीत आहे. दमनक : आरोग्य म्हणजे काय? ते कशाशी खातात? करटक : माहिती-महापुराच्या या काळात तुला हा प्रश्न पडावा याचे आश्चर्य वाटते. पण बेट्या तू मूळचाच ढिला. तर ऐक . "आरोग्य हा निरोगी मनुष्याच्या डोक्यावरचा असा अदृश्य सोनेरी मुकुट आहे की जो केवळ रोगी मनुष्यालाच दिसू शकतो" . (हा हा! कैसा फसाया! अशी महावाक्ये माझ्याकडे खूप आहेत. ) दमनक (खिन्नपणे ): माफ करा. पण माहिती-महापुराच्या काळात , या विषयावर हजारो ब्लॉग्स असताना आणखी एका ब्लॉगचे प्रयोजनच काय? स्व-व्यासंग-प्रदर्शन हा ब्लॉगकर्त्याचा छुपा हेतूच त्यातून केवळ साधला जाणार नाहीये का? करटक : त्याच्या हेतूशी तुला काही घेणेदेणे नाही. तू आपला स्वार्थ पहा. सध्याचे बहुतांश ब्लॉगकर्ते माहितीचा मूळ स्रोत न व...
Posts
Showing posts from July, 2019