पोस्ट क्र . १: प्रस्तावना, मनोगत, निवेदन वगैरे.
ढोल-ताशांचा कडकडाट.
दोन कोल्हे येतात. दमनक आणि करटक . यांची तुमच्याशी पंचतंत्रात ओळख झाली होतीच.
दमनक - पन्नाशीचा, संसारी, विनम्र, आळशी . सर्व गोष्टींबाबत अफाट कुतूहल हा याचा सर्वात मोठा सद्गुण .
करटक - बुजुर्ग-दिग्दर्शक, हितचिंतक , टप्पल-मारक. सध्या तो ब्लॉगकर्त्यास चॅनेल करीत आहे.
दमनक : आरोग्य म्हणजे काय? ते कशाशी खातात?
करटक : माहिती-महापुराच्या या काळात तुला हा प्रश्न पडावा याचे आश्चर्य वाटते. पण बेट्या तू मूळचाच ढिला. तर ऐक . "आरोग्य हा निरोगी मनुष्याच्या डोक्यावरचा असा अदृश्य सोनेरी मुकुट आहे की जो केवळ रोगी मनुष्यालाच दिसू शकतो". (हा हा! कैसा फसाया! अशी महावाक्ये माझ्याकडे खूप आहेत. )
दमनक (खिन्नपणे ): माफ करा. पण माहिती-महापुराच्या काळात , या विषयावर हजारो ब्लॉग्स असताना आणखी एका ब्लॉगचे प्रयोजनच काय? स्व-व्यासंग-प्रदर्शन हा ब्लॉगकर्त्याचा छुपा हेतूच त्यातून केवळ साधला जाणार नाहीये का?
करटक : त्याच्या हेतूशी तुला काही घेणेदेणे नाही. तू आपला स्वार्थ पहा. सध्याचे बहुतांश ब्लॉगकर्ते माहितीचा मूळ स्रोत न वाचताच केवळ एकमेकांना कॉपी-पेस्ट करत असतात. त्यामुळे एका ब्लॉगवर झालेली चूक लवकरच तुला सर्वत्र पसरलेली आढळेल. आणि अर्धसत्याचे केवळ महापीठच असे जे व्हॉट्सऍप , ते तर सध्या फारच जोरात आहे हे तू जाणतोसच. तर हा प्रमुख दोष तुला या ब्लॉगमध्ये आढळणार नाही. मूळ स्रोताचा रेफरन्स प्रत्येक जागी दिला जाईल.
दमनक : बापरे, म्हणजे मला तोही वाचावा लागेल काय?
करटक : नाही नाही. त्याचा हेतू केवळ ब्लॉगकर्त्यास सत्यशोधनाच्या "लायनी" वर ठेवणे इतकाच असेल.
दमनक : हे ठीक दिसते. पण गेली पाच वर्षे आरोग्यविषयक साहित्य वाचून माझ्या आरोग्यात काहीच फरक पडला नाहीये. ही वाचकांची घोर वंचना आहे. खरा व्यायाम वगैरे करावा लागेल काय? नवीन साधने, गोळ्या यावरील खर्च वाढेल काय? मी असले काही करणार नाही, सांगून ठेवतो.
करटक : हे बघ, "तुम्ही कोल्ह्याला पाणवठयावर नेऊ शकता, पण पाणी अखेर कोल्ह्यालाच प्यावे लागते" अशी जंगलातली जुनी म्हण आहे. व्यायाम वगैरे करावा लागेलच. तेंव्हा पहा आपला विचार.
दमनक : बोंबला! (खिन्नपणे परत टीव्ही पाहू लागतो!).
xxx

छान सुरुवात. शुभेच्छा!
ReplyDeleteसुरुवात तर छान झाली.
ReplyDeleteएकदम छान! नियमित लिहिण्याकरता शुभेच्छा. वाचत राहूच.
ReplyDelete